Chhota Pudhari | नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत – घनश्याम दरोडे

Chhota Pudhari Ghanshyam Darode | सध्या राजकीय वर्तुळात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन – तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा देखील सुरू आहेत. तर शिंदे (Eknath Shinde Team) गटातील 9 आणि भाजपमधील (BJP) 9 जनांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जातं आहे. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Pudhari Ghanshyam Darode) याने सरकारने काल घेतलेल्या नोटाबंदी निर्णयावरुन सरकार टोला लगावला आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांची देखील आपल्या शैलीत खिल्ली उडवली आहे.

Ghanshyam Darode Commented On Eknath Shinde Team And Bjp

छोटा पुढारी घनश्याम दरोडे म्हणाला की, मंत्रिमंडळ विस्ताराची परिस्थिती अशी झाली आहे की, 9 नवरी, 50 नवरदेव , सगळे बाशिंग बांधून बसलेले आहेत. परंतु नवरी कोणाला कुंकू लावते हे त्यांनाच माहीत, अशा शब्दात छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे. तसचं जे शिंदे गटात मंत्रिपद मिळेल म्हणून गेलेत त्याचं काय होईल हे त्यांनाचं माहीत. पण जर मी मंत्रिमंडळाची नावं काढायला असतो तर सर्वांनाच मंत्री केलं असतं अशी खोचक टिका देखील त्याने यावेळी केली. याचप्रमाणे काय झाडी,काय डोंगर, काय हाटेल म्हणणाऱ्या शहाजी बापूंना जर मंत्रिमंडळात स्थान मिळाल तर चांगलं आहे अशी इच्छा देखील घनश्याम दरोडे याने व्यक्त केली.

Ghanshyam Darode Comment On 2000 Notes Ban

दरम्यान, सरकारने घेतलेल्या दोन हजाराच्या नोटबंदीबाबतच्या निर्णयावर देखील घनश्याम दरोडेने भाष्य करत म्हटलं की, सामान्य लोकांना 2 हजाराची नोट बंद झाली काय किंवा चालू राहिली तरी रडू येत नाही आणि हसूही येत नाही. कारण त्यांच्याकडे दोन हजाराची नोटच नाही. तरीही सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. असा टोला देखील त्यावेळी त्याने लगावला.

महत्वाच्या बातम्या-