Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेसमधून निलंबित असलेले आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप प्रवेशाबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले, “राजकारणात शत्रू आणि मित्र कधीच कायमचे नसतात. 2019 विधानसभा निवडणूक मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलो होतो. राजकारणामध्ये कालचे विरोधक आजचे मित्र होतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझा कौटुंबिक संबंध आहे. राजकारणामध्ये पक्षापलीकडे देखील संबंध असतात.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी काँग्रेसमधून निलंबित आहे. 2009 मध्ये सावनेरमध्ये मी लढलो. तर 2014 निवडणुकांमध्ये मी अनिल देशमुख यांचा पराभव कालोटमध्ये केला. त्याचबरोबर 2019 ची निवडणूक मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढवली होती. त्यामुळे सध्या तरी पक्ष बदलायचा प्रश्न उद्भवत नाही.”
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या घरी नाश्त्याचा आनंद घेतला. भाजपचे दिग्गज नेते आमच्या भेटीला आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विदर्भात विकासाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ते विदर्भासाठी काम करतात.”
महत्वाच्या बातम्या
- Yashasvi Jaiswal IPL 2023 | छोट्या दुकानदाराचा मुलगा ठरला ‘यशस्वी’! ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर
- Raj Thackeray | “महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले…”; राज ठाकरेंचा पुढचा मुद्दा
- Raj Thackeray | “मग मी काय मंडप…”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार
- Vajramuth Sabha | मविआमध्ये वज्रमुठ सभांसाठी पुन्हा हालचाली सुरू, पुण्यात कधी होणार सभा?