Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार

Ajit Pawar | कोल्हापूर : आज ( 20 मे) विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवारांनी मोदींसह शिंदे- फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना देखील गृहखात्याबाबत सल्ला दिला आहे.

नोटबंदीवर अजित पवारंची सकारात्मक प्रतिक्रिया ( Ajit Pawar Comment On 2000 Notes Ban ) 

सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला बघायला मिळतोय. मी अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं, तेव्हा मात्र आम्ही आर्थिक शिस्त ठेवली होती. परंतु, आता तसं बघायला भेटत नाही. मागे आपल्याकडे एक निर्णय घेतला होता जुन्या 1000 आणि 500 ची नोट बंद आणि 500, 2000 हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. पण आता कालच सांगण्यात आलं की ही 2000 ची नोट पण बंद करणार आहोत. अरे नक्की चाललय तरी काय? असा प्रश्न देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे. तसचं काही निर्णय नक्कीच घ्यावे लागतात परंतु सतत होत असेल तर याबाबत विचार केला पाहिजे. जर देशाचं हित यामध्ये असेल तर आमच काही मत नाही. परंतु जो काही राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे त्याला आळा बसला पाहिजे. असं अजित पवार म्हणाले.

राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे -अजित पवार  ( Ajit Pawar Comment Corruption )

तसचं राज्यामध्ये जवळपास 1लाख कोटी रुपयांची 31 मार्चच्या आधीची बिल देणं बाकी आहेत. मग सांगा नक्की कुठं पैसा गेला? का आर्थिक शिस्त बिघडली? याला जबाबदार कोण? सत्तेत येऊन तुम्हाला जूनमध्ये 12 महिने होतील आतापर्यंत तुम्ही काय- काय केलं? असा प्रश्न देखील शिंदे- फडणवीस सरकारला अजित पवारांनी विचारला आहे. वर्षभरात जनतेला गद्दार शब्द पटलेला आहे . 50 खोके शब्द देखील जनतेला पटलेला आहे.

दरम्यान, आमच्या काळात ज्या कामांना, प्रकल्पना मंजूर देण्यात आली होती. त्यांना या सरकारने स्थगिती दिली. यामुळे सत्तेत बसलेल्या सरकारने पण समजू नये की, ही सत्ता कायम राहील. जस कर्नाटक मध्ये जनतेने त्यांना जागा  दाखवून दिली तशी महाराष्ट्रतली जनता पण जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जे गृहखातं आहे. तर फडणवीसांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, असा सल्ला देखील अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.