Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी सुरू आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच ( Eknath Shinde) आव्हान केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray comment on Sudhir Mungantiwar )

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जर सुधीर मुनगंटीवार हे “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असतील, तर आताच मी राजीनामा देतो”. असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर मुनगंटीवार यांचे सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. याचप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील भाष्य करत म्हटलं की, जे काही मिंथे सरकार नालेसफाई करत आहे. ते म्हणजे राज्यात आधीच ते सत्तेत आल्यापासून चिखल झाला आहे. सगळीकडे भ्रष्टाचार, रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळा याबाबत आम्ही या गद्दारांविरोधात तशी तक्रार केलेली आहेच. अशा शब्दांत निशाणा साधला आहे.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होत की, पोपट मेला आहे. 2024 मध्ये निवडणुका होणारच आहे. तुमच्याकडे जे शिल्लक आमदार आहेत त्यांना राजीनामा द्यायाला सांगा. तुम्ही देखील वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. वरळीत टेस्ट करू. तुम्हाला आनंद होतोय ना… पोपट मेला की जिवंत ते वरळीत बघू चेक करू, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होत. याचप्रमाणे अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला होता. त्यांच्या या आव्हानाला आदित्य ठाकरेंनी प्रतिआव्हान केलं आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-