Sameer Wankhede VS Shahrukh | बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने समीर वानखेडेंना मेसेज केला; वाचा संपूर्ण चॅटिंग

Sameer Wankhede VS Shahrukh | मुंबई: कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात सीबीआयकडून चौकशी देखील चालू आहे. दरम्यान, सीबीआयकडून अनेक आरोप देखील करण्यात आले आहे. तर गुरुवारी (18मे) रोजी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स जारी केले. परंतु, समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी देखील पार पडली. सुनावणीवेळी वानखेडे यांच्या वकिलांनी थेट शाहरुख खान ( Shahrukh Khan ) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील मोबाईल चॅट न्यायालयात सादर करत अनेक खुलासे केले आहे.

शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये 3 ऑक्टोबर 2021 ला बोलणं  ( Shah Rukh Khan and Sameer Wankhede )

शाहरुख खान Shahrukh Khan :  सर एक वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का? प्लीज मी बोलू शकतो का?

समीर वानखेडे Sameer Wankhede : कॉल करा प्लीज.

त्यानंतर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये फोनवरुन काही वेळ बोलणं देखील होत. त्यानंतर पुन्हा शाहरुखचा मेसेज  ( Shah Rukh Khan Message Sameer Wankhede )

शाहरुख खान Shahrukh Khan : तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या विचाराबद्दल आणि भावनेबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी माझ्या मुलाला एक उत्तम माणूस बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल, अशी मी तुम्हाला खात्री देतो. आपल्याला देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू युवक हवे आहेत. देशाच्या भविष्यासाठी तरुणांमध्ये बदल घडवून आणणे आपल्या हातात आहे. मला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

समीर वानखेडे Sameer Wankhede : माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत आहे.

शाहरुख खान Shahrukh Khan : तुम्ही व्यक्ती म्हणून खूप छान आहात. प्लीज माझ्या मुलावर दया दाखवा. तो जेलमध्ये असताना त्याच्याकडे लक्ष असू द्या. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला सांगा, आपण नक्की भेटूया. मला मदत केल्याबद्दल खूप धन्यवाद! आर्यनला ( Aryan Khan ) तुरुंगात राहू देऊ नका. तो तुरुंगात राहिला तर त्याचा अंतरात्मा वेगळ्या दिशेने विचार करायला लागेल. मी तुमच्याकडे भीक मागतो, कृपया त्याला जास्त दिवस तुरुंगात ठेवू नका. त्याला जास्त दिवस तुरुंगात ठेवलं तर तो पूर्णपणे उध्वस्त होऊन जाईल. प्लीज प्लीज मी एक बाप म्हणून तुमच्याकडे याबाबत भीक मागतो.

दरम्यान, वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितलं की, सीबीआयचे आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅट न्यायालयात सादर केली आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक बाप त्यामध्ये माझ्या मुलाची काळजी घ्या म्हणून विनंती करत आहे. जर वानखेडे यांनी खंडणी मागितली असती तर शाहरुखने त्या मेसेजमध्ये पैशांचा उल्लेख केला असता. परंतु त्या दोघांमध्ये जे बोलणं झालं त्यामध्ये कुठेतरी पैशांचा उल्लेख आला नाही. फक्त लेकाची काळजी घ्या, असंच म्हणणं मेसेजमध्ये पाहायला मिळत आहे. असं वानखेडे यांचे वकिल म्हणाले. यामुळे न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या