Sanjay Raut | नांदेड: काल (19 मे) दोन हजार रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देखील रिझर्व बँकेने दिले आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “गाजावाजा करत दोन हजाराची नोट बाजारात आणली होती. आता ती बंद केली आहे.” मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
“महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुका वज्रमुठीनेच लढणार आहे. कुणी काही म्हणू द्या. आम्ही एकत्र राहून घटनाबाह्य सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत”, असं देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी देखील नोटबंदी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “काय चाललय हे? काल फतवा काढला दोन हजार रुपयाची नोट बंद. यापूर्वीही नोटबंदी करण्यात आली होती. त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा बाजारात आणल्या होत्या. मात्र, काही वर्षात पुन्हा ही नोटबंदी आली. देशहितासाठी सरकार काही निर्णय घेत असेल तर त्याला आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु, मोदी सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने घेतलेले नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “आमचा नेहमी पाठिंबा…”; नोटबंदी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Raj thackeray | त्र्यंबकेश्वर मंदिराची शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये- राज ठाकरे
- Sameer Wankhede VS Shahrukh | बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने समीर वानखेडेंना मेसेज केला; वाचा संपूर्ण चॅटिंग
- Raj Thackeray | “हे निर्णय देशाला…”; नोटबंदीवर राज ठाकरेंची सडकून टीका
- Gautami Patil | “मी महाराष्ट्राची संस्कृती…”; गौतमी पाटीलचं छोटा पुढारी घनश्याम दरोडेला सडेतोड उत्तर