Share

Chandrashekhar Bawankule | “जो नेता आपलं घरं आणि ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? “

🕒 1 min read Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीबाबत भाकीत केलं आहे. ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीबाबत भाकीत केलं आहे.

ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक दिवस प्रकाश आंबेडकर कंटाळणार, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे युती टिकवण्याचे गुण नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

“जो नेता आपलं घरं, ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? ज्या नेत्याला आपलं घर सांभाळता येत नाही तो प्रकाश आंबेडकर यांच्याशी मैत्री किती दिवस टिकवणार, मला याची शंका आहे”, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. यावर बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळात असणे हे अत्यंत ऊर्जावाण बाब आहे. ज्या-ज्या वेळी बाळासाहेबांचे दर्शन होईल, त्या-त्या वेळेला हिंदुत्वाचे रक्षण करणारे आणि मुंबई, महाराष्ट्राला वाचविणारे बाळासाहेब यांच्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.”

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या