BSF Recruitment | सीमा सुरक्षा दलामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

BSF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सीमा सुरक्षा दलामध्ये (Border Security Force) नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बीएसएफने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी इच्छुक उमेदवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

बीएसएफच्या या भरती प्रक्रियेमध्ये (BSF Recruitment) एकूण 1248 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर), कॉन्स्टेबल (वॉशर मन), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (स्वीपर) आणि कॉन्स्टेबल (वेटर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (BSF Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती मोहिमेमध्ये (BSF Recruitment) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असावे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://haryanajobs.in/wp-content/uploads/2023/02/BSF-Constable-Tradesman-Recruitment-2023-Short-Notice.pdf

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://rectt.bsf.gov.in/

महत्वाच्या बातम्या