Weather Update | फेब्रुवारी महिन्यातच वाढला आहे उकाडा, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी (Cold) होती. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडताच कमाल आणि किमान तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या हवामानामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तापमानात (Weather Update) सातत्याने वाढ होत चालली आहे. या ठिकाणच्या काही भागात अगदी मे जून महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा जाणवत आहे. यंदा उन्हाळा लवकर सुरू झाला आहे. तर पुढचे काही दिवस पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आणि त्यानंतर काही दिवसात तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

साधारणता होळीनंतर तापमानात (Weather Update) वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच गरम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या (Take care of health in summer)

दरम्यान, उन्हाचे चटके चांगलेच जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या