BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

BJP | मुंबई : राज्यात शिुवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. अचानक सरकार कोसळलं आणि शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. यावरुन शिवसेनेत मोठा वाद झाला. ठाकरे गटाच्या हातून शिवसेना निसटली. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु असतानाच आता दुसरीकडे भाजप खासदाराने मोठा दावा केला आहे. भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ranjeet Sinha Naik Nimbalkar comment on NCP

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल”, असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

“पक्ष शिल्लक ठेवणे ही सध्या त्यांच्या अस्तित्वाची लढाई”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत”, असेही रणजीतसिंह नाईक म्हणाले आहेत.

“राजकीय स्वप्न बघणं हा गुन्हा नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. या बॅनरबाजीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केली. “महाराष्ट्रात ‘मुंगेरी लाल के सपने’ बघणारे बरेच लोक आहेत. राजकीय स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. मात्र 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच अस्वित्वात राहणार नाही”, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.