Share

Bhaskar Jadhav | “नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भास्कर जाधवांचा पलटवार

Bhaskar Jadhav | मुंबई : महाराष्ट्राच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस भास्कर जाधवांवर आक्रमक

“भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही आवाज बारीक केला”

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी दम दिल्याचा आरोप केला. ठीक आहे, मागच्यावेळी मी सांगितलं की, माझा आवाज जरा मोठा आहे. तुमचाही आवाज मोठा होता. नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही आवाज बारीक केला अशी फडणवीसांची मुलाखत मी ऐकली,” असं म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

Bhaskar Jadhav Answered to Devendra Fadnavis

“विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा काय सन्मान आहे, काय आदराची भावना आहे हे सांगितलं. तसेच ते कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं सांगितलं. आम्हाला हे मान्य आहे, मात्र माझी नम्र सूचना वजा विनंती आहे की, हे आमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावरील अध्यक्षांची आहे”, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

“मी केवळ एवढाच छोटासा विषय ऐकून…”- Bhaskar Jadhav

“मी केवळ एवढाच छोटासा विषय ऐकून घ्या सांगत होतो की, सर्वसाधारणपणे राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने मांडायचा असतो. यावर पॉईंट ऑफ प्रोसिजर म्हणून मी सांगत होतो की, त्यावर सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांपैकी एकाने उठून एखाद्या सन्माननीय सदस्याने त्याला अनुमोदन द्यायचं असतं.”

महत्वाच्या बातम्या-

Bhaskar Jadhav | मुंबई : महाराष्ट्राच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now