Sadabhau Khot | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न लागू करा : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झालं सत्ता देखील स्थापन झाली. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. महागाई, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हवा तसा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग सरकारवर नाराज असल्याच पाहायला मिळतं आहे. सत्ताकारणात गुरफटलेल्या राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता सरकारच लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारवर हल्लाबोल करत आम्ही साताराहून मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढणार असल्याच इशारा दिला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत (What did Sadabhau Khot say)

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लवकरात- लवकर लक्ष द्यावे असं म्हटलं आहे. याचप्रमाणे येत्या २२ मे रोजी कऱ्हाड ते सातारा यादरम्यान ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात येईल. जर सरकारने आम्हाला चर्चेस बोलवलं नाही तर आम्ही सातारमधून थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील खोत त्यांनी दिला आहे. तसचं महाराष्ट्रामध्ये प्रती टन उसाला तीन हजार रुपये फक्त भाव मिळतोय परंतु गुजरातमध्ये साडेचार हजार भाव मिळतोय त्यामुळे ‘शेतकऱ्यांना उसाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळण्यासाठी महाराष्ट्रात देखील गुजरात पॅटर्न (Gujarat Pattern) लागू करा’ अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

दरम्यान, खोत पुढे म्हणाले की, अनेक साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. या कारखान्यांमध्ये स्पर्धा होण्यासाठी दोन कारखान्यांमधील २५ किलोमीटरचे हवाई अंतर कमी करण्यात यावं. तसचं शेतकऱ्यांना जो काही अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे याबाबत देखील सरकारने तातडीने मदत करणे गरजेच होते परंतु याकडे देखील दुर्लक्ष केलं आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या वेशीवर टांगण्याचे काम या ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. असं देखील सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-