Share

“राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी तोलून मापून…”; Ajit Pawar यांनी दिला मोलाचा सल्ला

Ajit Pawar gave advise to party members

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे आज (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हंटल आहे.

“राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना माझं सांगणं आहे की तोलून मापून बोला. कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्यावर नाराज होईल असलं काही बोलू नका. आमच्याकडेही ते लगेच दांडकं घेऊन येतात, दादा तुमचं काय म्हणणं आहे? अरे बाबा थांबा ना जरा. मी उपमुख्यमंत्री असलो तरीही माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही”, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

पुढे ते म्हणाले, “एक लक्षात ठेवा जिथे जिथे शेतकऱ्यांना मदत लागेल तिथे आम्ही महायुतीचं सरकार म्हणून तुमच्या पाठिशी आहोत. पण तुम्हालाही सांगणं आहे की तरुणांनो या कानाचं ऐकून त्या कानी सांगत बसू नका. तरुणांनी आपली संघटना मजबूत करण्यासाठी काम केलं पाहिजे. अशातूनच नेतृत्व तयार होत असतं.”

यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरूनही अजितदादा स्पष्ट बोलले. “पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो”, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे आज (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics