Ajit Pawar Vs Eknath Shinde | अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली; म्हणाले..

Ajit Pawar | सातारा : आज (8 मे) ला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे सातारमधील जाहीर सभेला उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथी शिंदे ( Eknath Shinde) यांची देखील खिल्ली उडवली. तर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत म्हटलं की, हे सरकार फक्त प्रकल्प आणतो म्हणतात परंतु, त्याच्यात दम नाही प्रकल्प राज्यात आणण्याचा अशी टीका देखील केली .

महाराष्ट्रात शिंदेंना कोणी ओळखत नाही मग कर्नाटकमध्ये त्यांना कोण ओळखणार?

जे गद्दार आहेत त्यांनी लोकांची काळजी न घेता आम्ही मंजूर केलेल्या कामाला स्थगिती दिली. आमच्या काळात कामांला कधीच स्थगिती दिली नाही परंतु हे सत्ताधारी सरकार आलं आणि कामाला स्थगिती द्यायला लागलं . का? हे काय आमदारांच्या घरच काम होत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. याचप्रमाणे शिंदे- फडणवीस सरकारनं राज्याच्या विकास कामाकडे लक्ष न देता कर्नाटकच्या निवडणुकीच्या प्रचारकडे मोर्चा वळवला आहे. तिथं त्यांना कोण ओळखतय? महाराष्ट्रात त्यांना कोणी ओळखत नाही मग तिथं कोण ओळखणार? या ठिकाणी शिंदेंच भाषण सुरू झालं की पाठीमागच्या खुर्च्या रिकाम्या होतात. भाषण करताना त्याना नुसत्या इकडून- तिकडून चिठ्ठी आणून देताय . फक्त चिट्या वाचायची काम सुरू आहेत. कोणाची हिंमत नाही होणार कोणीही माझ्या भाषणादरम्यान मध्ये बोलायची. पण यांच्या भाषणात होते . अशा शब्दात अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली .

(Ajit Pawar Commented On Eknath Shinde)

दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, शिंदेंना काहीही झालं की लगेच सातारची वाट धरतात. मग म्हणतात शेती करतोय, आहो इथं स्टोबेरी बघून कुठं शेती होते का? मग होते नुसती चर्चा मुख्यमंत्री कुठं गेले ? कुठं गेले? तेव्हा सांगितलं जातं साहेब फाइल काढायला गेले. पण 65 फाइल काढायला किती तीन दिवस लागतात का? आम्ही 3 तासात काढतो. अशी फिरकी घेत अजित पवारांनी शिंदेंना सुनावलं आहे. सध्या राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या,बअनेक युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. फक्त आश्वासन दिलं जातय. यामुळे नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे.असं देखील अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-