Abdul Sattar | “आम्ही कुत्रा असेल तर संजय राऊत महाकुत्रा”; अब्दुल सत्तारांचं टीकास्त्र

Abdul Sattar | पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी “मला कुत्रा हे चिन्ह जरी दिल तरी आमदार होणार” असं वक्तव्य केलं होत. त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार निशाणा साधला होता. तसचं खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील भाष्य केलं होतं. एकबाजूला कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाला काही तासच शिल्लक राहिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 12 मे पर्यंत कधीही लागू शकतो यामुळे सर्वांचं लक्ष या दोन्हीही घटनांकडे लागलं आहे. जर सत्तासंघर्षाचा निकालात 12 आमदार अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे. यातच आता अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर जहरी टीका करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) देखील हल्लाबोल केला आहे.

आम्हाला कुत्रा म्हणतो पण तो महाकुत्रा आहे : अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार म्हणाले की, जो रोज सकाळी उठून टीव्हीवर येतो आणि आमच्यावर भुंकतो, आमच्या मतांवर निवडून येणारा आम्हाला कुत्रा म्हणतो पण तो महाकुत्रा आहे. रोज तो सामनामधून काहीही असत्य लिहतोय मग आम्ही आमचे पैसे घालून सामना का वाचवा. जर संजय राऊत कुत्र्याची नाही तर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा मग मी राजीनामा देतो. अशी जहरी टीका सत्तार यांनी केली . तसचं त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लबोल करत म्हटलं की, जेव्हा मी उद्धव ठाकरेंना सोडलं तेव्हाच त्यांना माहीत आहे मी का सोडलं. ज्यांना आम्ही मतदान देऊन निवडून आलं सत्ता हाती दिली त्यांना माहीत तरी आहे का शेताचा बांध. माझ्या इतका कोणताच कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर फिरला नसेल इतकं मी फिरलो आहे. त्या संजय राऊतांचं दुखण वेगळं आहे जर राऊतांना – ठाकरेंना बांध माहीत असता तर 40 जण गेले नसते.असा हल्लाबोल सत्तारांनी केला.

(Abdul Sattar Commented On Sanjay Raut )

दरम्यान, सत्तार पुढे म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात जो काही सत्तासंघर्षाबाबत निर्णय होईल त्यांची आम्हाला भीती नाही तर त्याची जास्त भीती ठाकरे गटाला आहे. कारण जर निकाल आमच्या बाजूने आला तर राहिलेलं नेते पण आमच्याकडे येतील. याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे . याबाबत सांगायचं झालं तर, 82 टक्के पंचनामे झाले आहेत. आणखी 4 दिवस पाऊस पडणार आहेत. यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे कोणीतरी त्याच राजकारण करू नये असं सत्तारांनी म्हटलं. परंतु अवकाळीमुळे जे काही नुकसान झालं आहे याबाबत सरकारने अजूनही मदत केली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. जर हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हणतं असेल तर अजूनही शेतकरी वाऱ्यावर का? शेतकऱ्याच्या मालाला भाव हवा तसा का मिळतं नाही असे प्रश्न देखील उपस्थित केले जातात.

महत्वाच्या बातम्या –