Share

Rupali Chakankar | महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 5 हजाराहून अधिक मुली गायब, रूपाली चाकणकरांनी दिली माहिती

Rupali Chakankar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष … Read more

Published On: 

Rupali Chakankar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून जानेवारी महिन्यात 1600 मुली गायब झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यामध्ये 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 16 महिन्यांपासून आम्ही सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत, असं रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या आहे.

लग्न, प्रेम आणि नोकरीत आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे यासंदर्भात गृह विभागाने लवकरात लवकर पाऊल उचलावी, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

मुली बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलं आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट (Supriya Sule’s tweet)

ग्रामीण भागातून अधिक प्रमाणात मुली गायब (More girls are missing from rural areas)

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे. यामध्ये अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमधून अधिक प्रमाणात मुली गायब होत आहेत. मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, पुण्यातून 2258, नाशिकमधून 161 कोल्हापूरमधून 144 ठण्यामधून 133, अहमदनगरमधून 101 आणि जळगाव मधून 81 मुली गायब झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install