Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे वाद काही मिटतांना दिसत नाही आहेत.  रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सभा घेतली आणि एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टिकेचे बाण सोडले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून खेडमध्येच एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे गटावर पलटवार केला.

नेमकं कोणाच्या सभेला अधिक गर्दी होती? यावरून आता वाद सुरू झाला. ठाकरे गटाचे नेते हे उद्धव ठाकरे यांच्या सभेला अधिक गर्दी होती म्हणत आहेत तर शिंदे गटाचे एकनाथ शिंदेंच्या सभेला अधिक गर्दी म्हणत आहेत.  यावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

“लोकांपेक्षा खुर्च्यांची गर्दी” (Adity Thackeray Tount On Eknath Shinde)

आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या सभेत लोकांपेक्षा खुर्च्यांची गर्दी अधिक असते. एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत. जनतेचे नाहीत.” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

गुढीपाडवा या सणानिमित्त मुंबईतील एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपस्थित राहिले ते म्हणाले, “आज राजकीय बाबींवर चर्चा करायला नको. सणसमारंभानिमित्त मी इथे आलो आहे. राजकीय भाष्य करणं हे बालिशपणा असेल. काही पक्ष असेच करत असतात. पण ते असेच आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. आज मी इतकंच म्हणेल की, सर्वांनी आजचा सन आनंदाने साजरा करावा”, असे आदित्य ठाकरे सभेत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या”

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.