Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET Protest) पेपरफुटीविरोधात झालेलं ऐतिहासिक आंदोलनामुळे थेट तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता! याच आंदोलनात तब्बल २६ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सोनम वांगचुक यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यात त्यांनी आपली भूमिका मांडली. “अभिजीत काही असा संत नाही ज्याला काहीच नको आहे. अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नक्कीच राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, मी त्यांचं खूप जवळून निरीक्षण केलं आहे,” असं विधान वांगचुक यांनी केलंय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
Sonam Wangchuk | दास, रंका आणि दिपकेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा
या मुलाखतीत वांगचुक यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना आधीपासूनच राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांनी आम आदमी पार्टीसाठी काम केल्याची आठवणही वांगचुक यांनी करून दिली. लोक अनेकदा या तरुणांच्या राजकीय हेतूंबद्दल प्रश्न विचारतात. त्यावर बोलताना वांगचुक म्हणाले, “मला स्वतःला वाटतं की, होय, त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. पण यात काहीच चुकीचं किंवा वावगं नाही.”
राजकीय महत्त्वाकांक्षा असणं ही एक अत्यंत स्वाभाविक गोष्ट असल्याचं वांगचुक यांनी स्पष्ट केलं. कधीकधी आपण जास्त विचार करतो. आंदोलनात असणाऱ्यांनी राजकारणापासून दूर राहावं, असं वाटतं. पण वांगचुक या तरुणांना अजिबात दोष देत नाहीत. उलट, ते अत्यंत अभ्यासू आणि चांगली माणसं आहेत. ते चांगल्या सामाजिक प्रश्नांवर लढत आहेत, असल्याचे वांगचुक म्हणाले.
जंतर-मंतरवरील त्या २६ दिवसांच्या उपोषणाची आठवणही वांगचुक यांनी सांगितली. “मी त्यांच्यासोबत आंदोलनात होतो, तेव्हा त्यांना एकच सल्ला दिला होता. या आंदोलनाला अजिबात राजकीय रंग देऊ नका.” कारण, आंदोलनाची पवित्रता टिकली तरच लोकांचा विश्वास उरतो. पुढे जाऊन राजकारण नक्की करा, पण सध्याचं आंदोलन अराजकीय ठेवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला होता. दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो मानल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
उद्या भ्रष्टाचार करणार, राजकीयदृष्ट्या स्वार्थी असेल
वांगचुक यांनी याच मुलाखतीत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. या व्यासपीठावर येणारे लोक स्वतःला भाजप, काँग्रेस किंवा आपचे कार्यकर्ते मानत नाहीत. ती एक निव्वळ विद्यार्थी चळवळ आहे. त्यामुळेच याला राजकीय रंग देणं अजिबात शहाणपणाचं नाही. लोक कधीकधी त्यांच्यावरच बंदूक रोखतात. “आम्ही फक्त तुम्हाला बघायला आलो होतो. त्याला आम्ही ओळखतही नाही. त्याने उद्या काही चुकीचं केलं, तर आम्ही त्यालाच जाब विचारू,” असं लोक म्हणतात. यावर वांगचुक यांनी स्पष्टच सांगितलं. तो उद्या भ्रष्टाचार करणार नाही, किंवा तो राजकीयदृष्ट्या स्वार्थी नसेल, याची मी खात्री देऊ शकत नाही. मला त्याच्याबद्दल एवढं सविस्तर काहीही माहीत नाही.
वांगचुक यांनी अभिनेता आमिर खानचाही चांगलाच समाचार घेतला. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाच्या वेळी आमिरने एक मोठा दावा केला होता. चित्रपट बनवताना आपण वांगचुकला ओळखतही नव्हतो, असं तो म्हणाला होता. यावर वांगचुक यांनी जबरदस्त पलटवार केला. “आमिर आणि माझी यापूर्वी अनेकदा भेट झाली होती. पण आमिर कदाचित त्याच्या ‘गजनी’ सिनेमातल्या पात्रासारखा वागतोय. ज्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस होता.” वांगचुक यांनी लगावलेल्या या मार्मिक टोल्यामुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, नीट आंदोलनानंतर अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) आता थेट ग्रामीण भागात पोहोचले आहेत. त्यांनी हिंगोलीतील लोहगाव आणि करंजाळा इथल्या जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. तिथली दुरवस्था पाहून त्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिलंय. “अशी दुरवस्था निदर्शनास आणून देणं गुन्हा असेल, तर माझ्यावर शंभर गुन्हे दाखल करा,” असा इशारा देत त्यांनी तात्काळ शाळा दुरुस्तीची मागणी केलीय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘शिंदेंसोबत वेळ जुळल्यासच परभणीत येणार’; बंडू जाधवांवर भडकलेल्या मनोज जरांगेंचा थेट इशारा
- ‘तू थर्ड क्लास माणूस, तुझी परतफेड मुंबईत करणार’; परभणीच्या मेळाव्यावरून मनोज जरांगेंचा बंडू जाधवांवर घणाघात
- मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले चर्चेचे दरवाजे उघडे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











