मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले चर्चेचे दरवाजे उघडे!

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेतून लवकरच मार्ग काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil hunger strike and Devendra Fadnavis reaction

नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय. कारण, अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

जरांगे पाटील यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर थेट मुंबई गाठू, असा खणखणीत इशारा त्यांनी दिलाय. १२ सप्टेंबरपर्यंत आपण सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यालाही त्यांनी कडाडून विरोध केलाय. याच वाढत्या तणावादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मोठी प्रतिक्रिया समोर आलीय.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट

नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घडामोडींवर सविस्तर भाष्य केलं. सरकारचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असून ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. “यापूर्वीही आपण यातून मार्ग काढला होता आणि पुढेही नक्कीच मार्ग काढू,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच यावर अतिशय संवेदनशीलतेने काम करत असल्याचं फडणवीस म्हणाले. ज्या मागण्या कायदेशीर आणि संविधानाच्या चौकटीत असतील. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत नसतील, त्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे नेहमी उघडे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न आता वेगवान झाले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या मनोज जरांगे यांच्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे सकारात्मक असून येत्या एक-दोन दिवसांत यातून नक्कीच मार्ग निघेल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही