मुंबई – देशातील तरुण रस्त्यावर उतरून न्याय मागतोय. त्यांच्यावर लाठ्या उगारल्या जातायत. पण देशाच्या पंतप्रधानांना त्यांना भेटायला वेळ नाहीये. वेळ आहे तो फक्त ‘गद्दारांना’ भेटायला! असा थेट आणि सणसणीत आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
शिंदे गटाच्या खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी त्यांना ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ असा आधार दिला. याच विधानावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींची ही भाषा म्हणजे थेट धमकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
Uddhav Thackeray on PM Modi: मोदींची ती धमकी कुणासाठी?
तरुणांना वाऱ्यावर सोडलंय. सध्या जगभरात भारताच्या नव्या पिढीची चर्चा आहे. या तरुणांनी सरकारला जेरीस आणलंय. पण त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. काहींना तर थेट जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झालीये. विद्यार्थ्यांचा असा छळ होत असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री गप्प का? असा संतप्त सवाल ठाकरेंनी विचारलाय. आता केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन भागणार नाही. संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
त्यामुळेच मोदींच्या त्या आश्वासनावर ठाकरेंनी मोठा संशय व्यक्त केलाय. अमित शाह मुंबईत असतानाच शिंदे गटाचे खासदार मोदींना भेटतात. आणि मोदी त्यांना घाबरू नका सांगतात. मग हा धमकीवजा संदेश नेमका कुणासाठी? सर्वोच्च न्यायालय, अमित शाह की देवेंद्र फडणवीस? असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय.
या भेटीच्या बातम्या आता देशभरात पोहोचल्या आहेत. आम्ही या सर्व बातम्यांचे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. थोडक्यात सांगायचं तर, गद्दारीचा हा व्हायरस देशभरात पसरतोय. मोदींचा हा संदेश भविष्यात पक्ष फोडणाऱ्यांसाठी आहे का? असा रोखठोक प्रश्न विचारत ठाकरेंनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिलीये.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सदिच्छा भेट’ की मोठी राजकीय हालचाल? ‘या’ गटाचे खासदार मोदींना भेटणार!
- ‘शिक्षण आणि नाती कधी विसरू नका’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मोदींचा खास सल्ला
- NCP मध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत; तटकरे यांना हटवण्याची मागणी, प्रशांत किशोरांची भूमिका चर्चेत













