Share

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर पुन्हा बदलीची चर्चा, ग्राहक पंचायतीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मात्र त्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेमुळे ग्राहक पंचायतीने आक्रमक होत सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe FDA Action - आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे

पुणे – भेसळखोरांवर धडक कारवाई केल्याची शिक्षा बदल्यांच्या रूपाने मिळणार का? राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या हाच प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातोय.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. रोज करोडो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त होत असल्याने साठेबाज हादरले आहेत. परिणामी त्यांच्या बदलीसाठी व्यापारी वर्गाकडून सरकारवर मोठा दबाव आणला जात असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

Tukaram Mundhe यांच्या बदलीला कडाडून विरोध

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मात्र मुंढेंच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सरकारला याबाबत थेट इशारा दिला आहे. मुंढे यांची कारवाई सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताची असल्याने सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे जर सरकारने मुंढेंची बदली केलीच, तर त्याविरोधात राज्यभर मोठी जनजागृती मोहीम राबवली जाईल असेही त्यांनी सांगितले. यासाठी ग्राहकांच्या सहभागातून एक व्यापक स्वाक्षरी मोहीमही हाती घेतली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळ आज मंत्रालयात जाऊन तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ग्राहकांची भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही