Share

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलला असून, आता २० जून रोजी या प्रकरणाचा अंतिम फैसला होणार आहे.

Published On: 

Pawanraje Nimbalkar Case - Padamsinh Patil arrives at Mumbai Sessions Court in ambulance

मुंबई – तब्बल २० वर्षे जुन्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या राजकीय हत्याकांडाचा न्याय अजून किती काळ लांबणार? पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांच्या दुहेरी हत्याकांडाचा बहुचर्चित निकाल आज १६ जून रोजी मुंबई सत्र न्यायालयातून अपेक्षित होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे.

न्यायमूर्तींनी निकाल तयार करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता या ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल येत्या २० जून रोजी लागण्याची शक्यता आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: पद्मसिंह पाटील अ‍ॅम्ब्युलन्समधून कोर्टात

आज सकाळपासूनच कोर्टाच्या आवारात मोठी वर्दळ होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट अ‍ॅम्ब्युलन्सने न्यायालयात दाखल झाले होते. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची हजेरी घेतली, पण प्रत्यक्ष निकाल वाचनाला वेळ लागणार असल्याचं सांगत सुनावणी थांबवली.

या निकालासाठी हजर असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निकालास उशीर झाल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. “गेली २० वर्षे आणि १३ दिवस आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत,” असं म्हणत त्यांनी मस्तवाल राजकीय शक्ती आणि पैशाच्या मस्तीविरोधात आपला हा लढा असल्याचं स्पष्ट केलं. वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मात्र पोलीस प्रशासन प्रचंड सतर्क झालं आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी सायबर पोलिसांचीही करडी नजर आहे.

३ जून २००६ रोजी नवी मुंबईत पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैरातून तब्बल २५ लाखांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष २० जूनच्या सुनावणीकडे लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही