Share

अरबी समुद्रात मान्सूनची कोंडी; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला कोसळणार धो धो पाऊस?

अरबी समुद्रातील अडथळ्यामुळे मान्सून लांबणीवर पडला असून, आता १५ ऐवजी २० जूनला राज्यात पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Published On: 

Monsoon Update: Dark clouds and dry farm waiting for rain in Maharashtra

🕒 1 min read

मृग नक्षत्र लागून गेले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही, यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा पुरता वैतागला आहे. आज १५ जून उजाडूनही पावसाने दांडी मारल्याने ‘यंदा राज्यात पाऊस पडणार की नाही?’, असा धडकी भरवणारा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला आहे.

हवामान विभागाच्या सुरुवातीच्या (Rain Forecast) अंदाजानुसार आज (१५ जून) राज्यात मान्सून धडकणार होता. पण अरबी समुद्रात मान्सूनची (Monsoon Update) वाटचाल अचानक थबकली आहे.

Monsoon Update Maharashtra

अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी मान्सूनचा रस्ता अडवला असून, जोपर्यंत हे वारे पुढे सरकत नाहीत तोपर्यंत मान्सूनची स्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. परिणामी, आता थेट २० जूनलाच मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

एकीकडे उन्हाचा चटका वाढत चालला आहे, तर दुसरीकडे प्रशांत महासागरात ‘एल निनो’चा प्रभाव सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण घटण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. जागतिक हवामान संस्थांनीही याबद्दल अगोदरच धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आधी ११ जून, नंतर १५ जून आणि आता थेट २० जून… तारखांवर तारखा मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

सध्या जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली असली तरी, कृषी विभागाने अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. जोपर्यंत अधिकृत सूचना दिली जात नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करू नये, जेणेकरून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे पुढील ४ ते ५ दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, अरबी समुद्रातील कोंडी फुटल्याशिवाय महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना आणखी काही दिवस आभाळाकडे डोळे लावून बसावे लागणार हे नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही