🕒 1 min read
मुंबई – उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी अखेर एक सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे का? होय, कारण राज्याच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून आता धडक देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम मध्यावर पोहोचले आहेत. ५ जूनला गोवा आणि कर्नाटकात हजेरी लावल्यानंतर आता येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Monsoon ची जोरदार आगेकूच, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बहुतांश ठिकाणी पूर्व मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. आज प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील. दुपारनंतर येथे ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह छत्रपती संभाजीनगर, बीड आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
केरळमध्ये दाखल झाल्यापासून मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात लवकरच पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. नागरिकांना आता फक्त या पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपकेंचे भारतात पाऊल, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी; राजधानीत नेमकं काय घडणार?
- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
- के. अण्णामलाईंचा भाजपला अखेर रामराम! नव्या पक्षाची घोषणा करत हायकमांडबाबत केला मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












