Share

जेम्स कॅमेरॉन यांची मोठी घोषणा: ‘टर्मिनेटर’ परत येणार, पण अर्नोल्ड आणि सारा कॉनर नसणार!

Director James Cameron confirms a new Terminator reboot without Arnold Schwarzenegger, focusing on real-world AI threats.

Published On: 

Director James Cameron confirms a new Terminator reboot without Arnold Schwarzenegger, focusing on real-world AI threats.

🕒 1 min read

लॉस एंजेलिस: जगाला ‘टर्मिनेटर’ आणि ‘अवतार’सारख्या भव्यदिव्य सिनेमांची भेट देणारे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) पुन्हा एकदा एका नव्या अध्यायासाठी सज्ज झाले आहेत. ‘अवतार: फायर अँड ॲश’च्या प्रदर्शनानंतर आपण पूर्ण वेळ नवीन ‘टर्मिनेटर’ सिनेमाच्या लिखाणासाठी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या नव्या भागात एक मोठा बदल असणार आहे, ज्यामुळे जुन्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

सध्याच्या युगात Artificial Intelligence (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव पाहता, १९८४ मध्ये जे विज्ञानकथा (Science Fiction) वाटत होते, ते आज वास्तव बनले आहे. गिज्मोडोला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरॉन म्हणाले की, “माझ्याकडे नव्या कथेसाठी ३ इंच जाडीच्या नोट्स तयार आहेत. पण आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे सायन्स फिक्शनने आपल्याला गाठले आहे. जे पूर्वी फक्त सिनेमात घडायचं, ते आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलंय.” त्यामुळे आजच्या AI युगाशी सुसंगत कथा लिहिणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या नव्या चित्रपटात टर्मिनेटरची ओळख बनलेले अर्नोल्ड श्वार्झनेगर (T-800) आणि लिंडा हॅमिल्टन (सारा कॉनर) ही पात्रे दिसणार नाहीत. गेल्या ४० वर्षांचा जुना वारसा सोडून देऊन कॅमेरॉन आता एका पूर्णपणे नव्या रिबूटवर (Reboot) काम करणार आहेत. यात व्यवस्थेविरोधात लढणारे सामान्य आणि हतबल नायक असतील, जे प्रबळ शक्ती आणि AI विरोधात आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करतील.

२०१९ मध्ये आलेल्या ‘टर्मिनेटर: डार्क फेल्ट’ या चित्रपटाला १२३ दशलक्ष डॉलर्सचा मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे आता कोणतीही रिस्क न घेता कॅमेरॉन हे लिखाण ‘फ्युचर-प्रूफ’ करू पाहत आहेत. २०२६ च्या सुरुवातीला या सिनेमाचे लिखाण सुरू होणार असून, चित्रीकरण आणि प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना किमान २०२८ पर्यंत वाट पाहावी लागेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!