🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या फक्त आणि फक्त रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) या सिनेमाचीच लाट पाहायला मिळत आहे. नवीन वर्ष उजाडताच या सिनेमाने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाचा लाइफटाइम कमाईचा रेकॉर्ड मोडीत काढत ‘धुरंधर’ आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.
Dhurandhar Box Office Collection
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-थ्रिलर सिनेमाने प्रदर्शनाच्या २८ व्या दिवशीही (१ जानेवारी) ५.१२ कोटींचा गल्ला जमवत आपली एकूण कमाई ७२८.३७ कोटींवर नेली आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा आणि अगस्त्य नंदाचा ‘इक्कीस’ (Ikkis) रिलीज होऊनही प्रेक्षकांनी ‘धुरंधर’लाच पसंती दिली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतही या सिनेमाने ‘पठाण’ला मागे टाकत १७.५२ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.
एकीकडे कमाईचे विक्रम होत असतानाच, दुसरीकडे १ जानेवारीपासून या सिनेमाची ‘सुधारित’ प्रत (Revised Version) थिएटर्समध्ये दाखवली जात आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, सिनेमातील काही संवादांवर कात्री लावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमातील ‘बलुच’ (Baloch) हा शब्द म्युट (Mute) करण्यात आला असून, डिस्ट्रीब्युटर्सना तातडीने नवीन प्रिंट वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जगभरात १,१४३ कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाचा दुसरा भाग, म्हणजेच ‘धुरंधर २’( Dhurandhar 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिक्वेल रिलीज होणार असून, तो दाक्षिणात्य भाषांमध्येही डब केला जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दोन हजारांच्या ‘गुलाबी’ नोटांचे पुढे काय झाले? रिझर्व्ह बँकेने दिली मोठी अपडेट; तुमच्याकडे अजूनही नोटा आहेत का?
- मलाही मोठ्या ‘ऑफर’ आल्या होत्या, पण सगळ्यांना पळवून लावलं, तुम्हीही बळी पडू नका! – राज ठाकरे
- Ind vs Pak: १५ फेब्रुवारीला पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान! वर्ल्डकपसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूची हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











