🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रीडा विश्वासाठी २०२५ हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. तब्बल ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला क्रिकेट संघाने विश्वचषक उंचावला, तर रोहितच्या सैन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. इतकेच नव्हे, तर १८ वर्षांचा दुष्काळ संपवत विराट कोहलीच्या ‘आरसीबी’ने (RCB) आयपीएलची ट्रॉफी जिंकून चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता या यशाची शिदोरी घेऊन भारतीय खेळाडू २०२६ च्या रणधुमाळीसाठी सज्ज झाले आहेत.
Indian Sports Schedule 2026
नवीन वर्षाची सुरुवातच क्रिकेटच्या महाकुंभाने होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत T20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2026) थरार रंगणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी १५ शिलेदारांची फौज जाहीर केली असून, कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, स्टार फलंदाज शुभमन गिलला डच्चू देण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर रिंकू सिंग आणि इशान किशनचे पुनरागमन झाले आहे. १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) हायव्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
क्रिकेटच्या पलीकडेही भारताने मोठी झेप घेतली आहे. ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने ९० मीटरचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे. आता सप्टेंबरमध्ये जपानच्या नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) भारतासमोर १०८ पदकांचा आकडा पार करण्याचे आव्हान असेल. तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे २०२५ मध्ये उंचावलेला तिरंगा २०२६ मध्येही दिमाखात फडकणार, यात शंका नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- संभाजीनगरात राडा! “गाढवावरून धिंड काढू”; अंबादास दानवे अधिकाऱ्यांवर का भडकले? पाहा व्हिडिओ
- ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
- निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












