Share

मलाही मोठ्या ‘ऑफर’ आल्या होत्या, पण सगळ्यांना पळवून लावलं, तुम्हीही बळी पडू नका! – राज ठाकरे

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मनसे उमेदवारांना दिला यशाचा कानमंत्र. बोगस मतदारांवर कारवाई आणि निष्ठेबद्दल काय म्हणाले राज ठाकरे? वाचा सविस्तर बातमी.

Published On: 

Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says MNS Raj Thackeray Targeting Modi Government

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात (BMC Election 2026) सध्या राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात ऐतिहासिक युती झाली असून, मनसेच्या वाट्याला ५३ जागा आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या ५३ ही उमेदवारांची भेट घेत त्यांना विजयाचा ‘कानमंत्र’ दिला. यावेळी राज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत उमेदवारांना साद घातली, “मुंबई मराठी माणसाची आहे आणि ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा.”

निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांची निष्ठा कशी असावी, यावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत बजावले. “निवडणुकीच्या काळात तुम्हाला तोडण्यासाठी अनेक ऑफर येतील, पैशांची आमिषं दाखवली जातील. मात्र, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.” यावेळी स्वतःचा दाखला देत ते म्हणाले, “मलाही अनेक मोठ्या ऑफर आल्या होत्या, पण मी त्या सगळ्यांना पळवून लावलं. तुम्हीही स्वाभिमान जपा.”

मात्र, बैठकीत खरा माहोल गरम झाला तो राज यांच्या बोगस मतदारांवरील आक्रमक विधानामुळे. “प्रत्येक बूथवर आपली १० खंबीर माणसं उभी करा. बोगस मतदान होता कामा नये, यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा द्या. आणि जर कुणी बोगस मतदार सापडला, तर त्याला तिथेच फटकावून काढा,” असा थेट आदेशच राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या ‘ठाकरी’ इशाऱ्यामुळे मनसेच्या गोटात नवचैतन्य संचारले असून, आता मुंबईच्या रस्त्यावर मनसे स्टाईल प्रचार पाहायला मिळणार, हे नक्की झाले आहे.

MNS Candidate List BMC Election 2026

वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर
वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर
वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव
वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक
वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर
वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य
वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर
वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ
वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम
वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के
वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे
वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर
वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार
वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले
वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली
वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख
वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख
वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण
वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर
वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे
वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही