Share

AGR प्रकरणात वोडाफोन-एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा झटका; सरकारकडून सवलतीची मागणी फेटाळली

Supreme Court rejects AGR relief plea filed by Vodafone Idea, Airtel and Tata, saying petitions were poorly drafted. Court refused to interfere with government’s telecom policy.

Published On: 

Supreme Court dismissed the AGR relief petitions filed by Vodafone Idea, Airtel, and Tata Tele, citing procedural flaws. The court refused to interfere with the government's telecom policy decisions.

नवी दिल्ली – टेलिकॉम क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलीसर्व्हिसेसने दाखल केलेल्या AGR (Adjusted Gross Revenue) संदर्भातील सवलतीच्या याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने या याचिका चुकीच्या पद्धतीने तयार झाल्याचे सांगून फेटाळल्या.

याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात सादर केलेली भूमिका आणि युक्तिवादांवर नाराजी व्यक्त करताना कोर्टाने म्हटले की, अशा प्रकारची अर्धवट तयारी एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून अपेक्षित नाही.

Supreme Court Rejects AGR Relief Plea by Vodafone Idea, Airtel

वोडाफोन आयडियाकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेत व्याज, दंड आणि दंडावर व्याज यामधून सूट मागण्यात आली होती. कंपनीने म्हटलं की, केंद्र सरकारकडे 49 टक्के भागीदारी असताना, इतक्या मोठ्या रकमेची वसुली करणे हे न्याय्य नाही.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की ते सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे सरकारला एजीआरच्या थकबाकीबाबत सवलत द्यावी लागणार नाही.

सध्या वोडाफोन आयडियाकडे सरकारचा 49% हिस्सा आहे, तरीदेखील त्यांच्यावर 1.95 लाख कोटी रुपयांची AGR थकबाकी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले होते की, अन्यथा आर्थिक वर्ष 2025-26 नंतर कंपनी बंद पडू शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही