Share

काश्मीरच्या थरारात महाराष्ट्राला हादरा; पहलगाम हल्ल्यात 6 ठार, मदतीसाठी हेल्पलाइन सक्रिय

Six tourists from Maharashtra were killed in the Pahalgam terror attack. Government arranges special flights to bring back bodies. Emergency help desks activated in Mumbai and Srinagar for public assistance.

Published On: 

Pahalgam Terror Attack : Six from Maharashtra Dead, Emergency Helplines Active

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ( Pahalgam Terror Attack ) महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये संजय लेले, दिलीप डिसले (मुंबई), कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे (पुणे), तसेच हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. त्यांच्या पार्थिवांनां आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव दुपारी १२.१५ वाजता श्रीनगरहून एअर इंडिया विमानाने मुंबईत आणले जाईल. पुण्यातील दोघांचे पार्थिव संध्याकाळी ६ वाजता, तर उर्वरित दोघांचे पार्थिव दुपारी १.१५ वाजता निघून मुंबईत पोहोचतील.

Pahalgam Terror Attack : Six from Maharashtra Dead, Emergency Helplines Active

मुंबई विमानतळावर मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा, तर पुण्यात मंत्री माधुरी मिसाळ हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना होत आहेत. इतर पर्यटकांना सुरक्षीत परत आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी आपत्कालीन मदत केंद्र सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

📞 022-22664232, 8657106273, 7276446432

काश्मीरमध्ये पर्यटकांसाठीही 24×7 हेल्प डेस्क सुरु असून, संपर्क क्रमांक आहेत:

📞 0194-2483651, 0194-2457543

📱 व्हॉट्सॲप: 7780805144, 7780938397

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही