Share

मा. जनरलचा मोदी सरकारवर संताप; ‘फक्त पैसे वाचवण्यासाठी भरती थांबवणं… कोणाची होती ही बुद्धिमानी कल्पना?

“Who came up with the brilliant idea of reducing the Indian Army’s strength by 180,000?” Major General GD Bakshi lashes out after Pahalgam terror attack that left 27 dead. Attackers reportedly asked victims’ names and made them recite Kalma before killing.”

Published On: 

Pahalgam Terror Attack Major General GD Bakshi

Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत मंगळवारी दुपारी २:४५ वाजता दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. लष्कर-ए-तैयबाची शाखा ‘द रेझिस्टंट फ्रंट’ (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गुप्तचर यंत्रणांनुसार या हल्ल्यात दोन विदेशी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी होते. हल्लेखोरांनी पर्यटकांची नावे विचारून त्यांना ‘कलमा’ म्हणण्यास भाग पाडले आणि नकार देणाऱ्यांवर गोळीबार केला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. “भारतीय लष्करातील भरती थांबवून लष्कराचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी करणे, ही कोणाची ‘बुद्धिमानी’ कल्पना होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, “फक्त पैसे वाचवण्यासाठी जवानांची भरती थांबवणं, आणि त्याच दरम्यान नागरिक मारले जाणं, हे स्वीकारार्ह आहे का?”

Pahalgam Terror Attack: 27 Dead, Ex-General Slams Modi Govt

बक्षी यांनी पर्वतीय आणि दुर्गम भागांमध्ये लढण्यासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण व्यवस्थेवरही चिंता व्यक्त करत मोदी-शाह सरकारवर थेट टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही