Share

भरत जाधव पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित

Zee Studios, in collaboration with Chalk & Cheese Films and Film Jazz, is bringing the heartwarming Marathi film Aata Thambaycha Nay to theatres on May 1. The movie, based on real-life events, stars Bharat Jadhav in a comeback role and promises laughter, emotion, and inspiration for the whole family.

Published On: 

Aata Thambaycha Nay movie poster featuring Bharat Jadhav

झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आता थांबायचं नाय’ हा प्रेरणादायी आणि भावनिक चित्रपट येत्या १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्रदिनी प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब बघावा असा हा चित्रपट हसवत-खिदळवत अंतर्मुख करणारा ठरणार आहे.

या चित्रपटात परीक्षेच्या निमित्ताने उभ्या राहणाऱ्या संघर्षांना विनोदी आणि भावनिक रूपात मांडले असून, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा असा हा सिनेमा ठरणार आहे. ‘भोलानाथ’ हे लहान मुलांचे मोठ्यांसाठी असलेले गाणे आधीच सोशल मीडियावर गाजू लागले आहे.

चित्रपटातून सामान्य माणसाच्या संघर्षांची आणि स्वप्नपूर्तीसाठी घेतलेल्या झपाट्याची कथा उलगडली जाणार आहे. ‘आता थांबायचं नाय’ हे शीर्षकगीत नुकतेच प्रदर्शित झाले असून अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

“Bharat Jadhav Returns to the Big Screen with Inspirational Film ‘Aata Thambaycha Nay’ Releasing on May 1”

या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या सोबत आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, रोहिणी हट्टंगडी यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची मांदियाळी आहे.

शिवराज वायचळ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून, चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी संयुक्तपणे केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही