Share

Porsche Accident प्रकरणात मोठी कारवाई; दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द

Two doctors from Sassoon Hospital, Pune, face medical license suspension by the Maharashtra Medical Council for allegedly tampering with blood samples in the high-profile Porsche accident case involving a minor.

Published On: 

Porsche Accident Case

पुणे | प्रतिनिधी – पोर्शे अपघात ( Porsche Accident ) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर कठोर कारवाई करत वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगित केला आहे. या डॉक्टरांवर अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा गंभीर आरोप आहे. अपघाताच्या रात्री एक अल्पवयीन मुलगा पबमधून पार्टी करून परत जात असताना त्याने भरधाव गाडी चालवत एका दुचाकीस्वार तरुण-तरुणीला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात आरोपी हा पुण्यातील नामवंत बिल्डरचा मुलगा असल्याने पोलीस व वैद्यकीय यंत्रणांवर दबाव टाकण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपी मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी त्याच्या आईचे रक्त नमुने बदलून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे डॉक्टरांवर भ्रष्टाचाराचे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप झाले होते.

Pune Porsche Accident Case Update

या घडामोडीनंतर पुणे पोलिसांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली होती. आता, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करत त्यांचा परवाना तात्पुरता रद्द केला आहे.

पोर्शे प्रकरणात आतापर्यंत आरोपीच्या आई-वडीलांसह 10 जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचे तीन स्वतंत्र खटले दाखल आहेत. यामध्ये ससून रुग्णालयातील इतर कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही