🕒 1 min read
Anshuman Gaikwad passed away । सध्या क्रिकेटविश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन (Anshuman Gaikwad Death) झाले आहे. यामुळे क्रिकेटविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. ७१ वर्षीय गायकवाड हे दीर्घ काळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर इंग्लंडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
त्यांची कॅन्सरशी असलेली झुंज बुधवारी 31 जुलै रोजी अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड ब्लड कॅन्सरने त्रस्त होते, त्यांच्या उपचारासाठी बीसीसीआयचीही मदत मिळाली होती. पण, क्रिकेटच्या मैदानाचा हा धाडसी सलामीवीर मृत्यूला हरवू शकला नाही. प्राणघातक आजाराने त्यांना संपवले. अंशुमन गायकवाड हे ७० आणि ८० च्या दशकात भारतीय क्रिकेटचा विश्वासू चेहरा होता.
Anshuman Gaikwad यांची क्रिकेट कारकीर्द
अंशुमन गायकवाडने आपल्या कारकिर्दीत 40 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 30 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. त्या काळात त्यांनी 2 शतके ठोकली आणि 10 अर्धशतकेही झळकावली. त्यांनी 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 289 धावा केल्या. 1997 मध्ये ते पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. दोन वर्षे प्रशिक्षक राहिल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक
अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज लोकांनी शोक व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. “अंशुमन गायकवाड यांचे क्रिकेटमधील योगदान कायम स्मरणात राहील. ते एक हुशार खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.” असं नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- १० वर्षे काय अंडी उबवली? नरेंद्र मोदींचे भाषण बघताना कीव येते – उद्धव ठाकरे
- ‘वाकड्यात गेलात तर तोडू’, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे गटाला इशारा
- एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहील; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












