🕒 1 min read
eknath shinde vs uddhav thackeray | उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला. ठाकरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली.
”वाकड्यात गेलात तर तोडू”, असा इशारा ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिला. तसेच “भाजप म्हणजे चोर माणसं. राजकारणातील षंढ माणसे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. मोदींचे भाषण बघताना आता कीव येते. १० वर्षे काय अंडी उबवली?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडरच रद्द करायचे आहे. कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सगळीकडे पाणी तुंबतंय. हे विकासपुरूष आहेत? आरेचा भूखंड मुंबई बँकेला देत आहेत. त्यांचा भ्रष्टाचारी तिथे बसलाय ना. फनेल झोनमध्ये सध्या हवेतला टीडीआर काढत आहेत. अदानी माझा लाडला सुरूय. ही मुंबईच्या अस्तिवाची लढाई आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेच पाहिजे. राहिलेली गुर्मीही काढू”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“या लोकांना गाडू ही शपथ घेऊन निघा. प्रवाह उलटा फिरवणारा नेता असतो. ती ताकद आपल्यात आहे. अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहील; ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
- ”वाचवा वाचावा” ओरडत अमोल मिटकरी संडासात लपून बसला; मिटकरी हा फट्टू माणूस
- लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











