Share

”वाचवा वाचावा” ओरडत अमोल मिटकरी संडासात लपून बसला; मिटकरी हा फट्टू माणूस

🕒 1 min read Akola MNS : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव घेण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Akola MNS : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव घेण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलीसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसेसैनिक फरार राहू शकत नाही, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.

अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान यावर मनसे सरचिटणीस कर्ण बाळादुबळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले ”वाचवा वाचावा” ओरडत अमोल मिटकरी संडासात लपून बसला होता, मिटकरी हा फट्टू माणूस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमोल मिटकरींना तुडवणार, अशी धमकी कर्णबाला दुनबळेंनी दिली आहे.

काय म्हणाले कर्णबाळा दुनबळे?

  • “आम्ही पोलीस आणि संविधानाला मानणारी लोक आहेत. अजित पवारांनी जर तुम्हाला हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे अमोल मिटकरी यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण कोणाबद्दल बोलतो याचा विचार करावा.”
  • अमोल मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध झालेला आहे. अमोल मिटकरी हा कुठेही काहीही भुंकत असतो. त्यामुळे या माणसाने किती बोलायचं हे आता त्यानेच ठरवायचं.
  • “जर आम्ही नामर्दाची औलाद असतो, तर तू काल संडास मध्ये जाऊन का लपला होतास? मी जर तिथे असतो तर तुला तुझी औकात दाखवली असती. तुझ्या राष्ट्रवादीच्या लोकांना मी कोण आहे हे विचार”
  • “मी तुला बोललो आहे तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखा मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. भाषेची मर्यादा सर्वांनी पाळावी. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही. ती आमची संस्कृती नाही.
  • पळून जाणं आमच्या रक्तात नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही