Share

Manoj Jarange | अजित पवारांनी त्यांच्या माणसाला समज दिली तर बरं होईल; भुजबळांवरून जरांगेंचा पवारांना इशारा

Manoj Jarange | मुंबई: राज्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांचं हे आंदोलन सुरू असताना त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठ्यांनी केलेल्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी छगन भुजबळ राज्यामध्ये … Read more

Published On: 

Manoj Jarange | मुंबई: राज्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे.

ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांचं हे आंदोलन सुरू असताना त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.

मराठ्यांनी केलेल्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी छगन भुजबळ राज्यामध्ये सभा घेत आहेत. यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे ( Manoj Jarange )  यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर जरांगेंनी ( Manoj Jarange )  प्रतिक्रिया दिली आहे.

We have controlled our speech –  Manoj Jarange 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आम्ही आमचं बोलणं कंट्रोल केलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या माणसाला समज दिली तर चांगलं होईल.

त्यांचे माणसं थांबत नाहीये. त्याला आम्ही काहीच करू शकत नाही.  मुंबईमध्ये सभा घेण्यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. लवकरच याबद्दल फायनल होईल.”

दरम्यान, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगे यांच्यासह कोणीही भडकाऊ भाषण करू नये. भाषण करत असताना त्यात काय शब्द वापरायला हवे? हे प्रत्येकाने बघायला हवं.

प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. परंतु, ते मांडत असताना जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी, अशी माझी सर्वांना विनंती आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install