🕒 1 min read
Anjali Damania | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका करताना दिसले आहे.
अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यासह ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला.
यावेळी बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या या टिकेवरून अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
See how Bhujbal speaks – Anjali Damania
ट्विट करत अंजली दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या, “कुठेतरी असे वाटते की भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे.
आता तवा तवाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत ? जेल मधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे.”
महत्त्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | भुजबळांना जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती? प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- Haribhau Rathod | मनोज जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील – हरिभाऊ राठोड
- Sambhajiraje Chhatrapati | छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करा – संभाजीराजे छत्रपती
- Manoj Jarange | भुजबळांचं वय झालंय म्हणून ते काहीही बोलताय – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा नेते लय नमुनेबाज, ते ओबीसी नेत्यांना काय सुधारू द्यायचे – मनोज जरांगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











