Share

Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. हे आंदोलन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत धक्कादायक माहिती दिली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, … Read more

Published On: 

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.

हे आंदोलन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत धक्कादायक माहिती दिली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार आहे.

Maratha reservation is not available due to government’s refusal

ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.

राज्य आणि केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयश आले आहे. तरुणांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.

हि अतिशय धोकादायक बाब आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की, कृपया आपण कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या उर्जेची समाजाला गरज आहे. या तरुणास भावपूर्ण श्रद्धांजली.”

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली होती. यानंतर ओबीसी समाजाने देखील आंदोलन करायला सुरू केली होती.

त्यानंतर ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी होणार, नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील मोठं विधान केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही