🕒 1 min read
Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर खोचक टीका केली आहे.
ईडीच्या भीतीनं कोल्हापुरातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.
पवारांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी शरद पवारांनी सहानुभूती दाखवली नसल्याचं मुश्रीफांनी म्हटलं आहे. मुश्रीफांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Hasan Mushrif was a minister for 18 years – Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “हसन मुश्रीफ 18 वर्षे मंत्री होते. 18 वर्षे मंत्री असून सुद्धा आम्ही विकासासाठी भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झालो आहोत, असं म्हणायला त्यांना काही वाटत नाही का?
त्यांना ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री पद दिल्यानंतरही त्यांचं रडगाणं सुरूच आहे. शरद पवारांनी सहानुभूती दिले नाही म्हणजे काय? शरद पवार साहेबांनी काय काय करायला हवं?
पवार साहेबांनी काय करावं अशी त्यांची इच्छा आहे? माझा पाठिंबा कायम तुम्हाला असेल हे सांगणं म्हणजे सहानुभूती नाही का? सहानुभूती म्हणजे नेमकं काय असतं?”
दरम्यान, काल (25 ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सध्या बिळातील साप बाहेर पडू लागले आहे. आतापर्यंत हे साप बिळात लपून बसलेले होते. मात्र, आता या बाहेर आलेल्या सापांना ठेचण्याची वेळ आलेली आहे.
त्यांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागणार आहे. कोल्हापूर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पलचा उपयोग अख्ख्या महाराष्ट्रानं करावा, अशी मी इच्छा व्यक्त करतो. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या गद्दारी दिसू लागली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nawab Malik | नवाब मलिक कोणत्या गटाला पाठिंबा देणार? मलिकांच्या मुलीनं स्पष्टच सांगितलं
- Hasan Mushrif | नो कमेंट्स; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हसन मुश्रीफांची दोन शब्दात प्रतिक्रिया
- Sharad Pawar | काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट पडत नाही – शरद पवार
- Uddhav Thackeray | सत्ता येताच मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा सुरू केलीय; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











