Share

Dhananjay Munde | फक्त टीका करायला विरोधक उपस्थित राहतात; विरोधकांच्या गैरहजरीवर धनंजय मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया

🕒 1 min read Dhananjay Munde | मुंबई: आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) सातवा दिवस आहे. अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सभागृहात विरोधी पक्षनेते आणि आमदार उपस्थित नसल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे संतापले आहे. विरोधक फक्त टीका करायला उपस्थित राहतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. I have been a member of the House for … Read more

Published On: 

🕒 1 min read

Dhananjay Munde | मुंबई: आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) सातवा दिवस आहे. अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सभागृहात विरोधी पक्षनेते आणि आमदार उपस्थित नसल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे संतापले आहे. विरोधक फक्त टीका करायला उपस्थित राहतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

I have been a member of the House for the past several years – Dhananjay Munde

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “फक्त टीका करण्यासाठी विरोधक सभागृहात उपस्थित राहतात. मात्र, जेव्हा सरकार उत्तर द्यायला तयार असतं तेव्हा विरोधी बाकावर एक सदस्य सोडून बाकी कोणीही उपस्थित नसतं.

यासारखं दुसरं कोणतही दुर्दैव नाही. गेल्या अनेक वर्षापासून मी सभागृहाचा सदस्य आहे. परंतु असं विचित्र चित्र मी कधीच पाहिलं नाही.”

पुढे बोलताना ते (Dhananjay Munde) म्हणाले, “मी देखील विरोधी पक्ष म्हणून काम केलं आहे. विरोधी पक्ष वेगवेगळे मुद्दे मांडून सरकारला प्रश्न विचारतात.

विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार तयार आहे. पण सरकारचे उत्तर ऐकायला सभागृहात विरोधी पक्षच नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं.”

“जेवढा संवेदनशील सत्ताधारी पक्ष असतो, त्यापेक्षा जास्त संवेदनशील विरोधकांनी असायला हवं. सरकारचा विरोध करायचा म्हणून फक्त विरोधकांनी टीका केलीये.

या टीकांचं उत्तर ऐकायला उशिरा का होईना विरोधी पक्षनेते सभागृहात दाखल झाले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो”, असही ते (Dhananjay Munde) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही