Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागाला या अवकाळी पावसाने चांगलं झोपडलं आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये पालघर, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)
राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे
- Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
- Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज