Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात आयकर विभाग (Income Tax Department) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
आयकर विभाग यांच्या आस्थापनेवरील इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवली जात आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत अर्ज पोहोचतील अशा बेताने इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयकर भवन, 16/ 69, सिव्हिल लाइन्स, कानपूर, पिनकोड- 208001
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/12cDJ91jf0KSB9C1WN00MOElC5kNzIjyn/view
अधिकृत वेबसाइट (Official website)
https://www.tnincometax.gov.in/home
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
- Cucumber Salad | उन्हाळ्यामध्ये काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Garlic | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लसणाच्या ‘या’ पद्धतीने करा वापर
- Raj Thackeray | ‘राज ठाकरे भावी मुख्यमंत्री’, शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी