Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Eyebrow | टीम महाराष्ट्र देशा: जाड, काळ्या आणि दाट आयब्रो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. पण चुकीच्या खाण्याच्या  सवयीमुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे आयब्रोचे केस गळायला लागतात. आयब्रोच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे उपाय शोधतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. पण हे कॉस्मेटिक त्वचेसाठी आणि आयब्रोसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे आयब्रोची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करू शकतात. आयब्रोची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

आवळा (Amla-Eyebrow Care)

आवळा आपल्या आरोग्यासोबतच आयब्रोसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये पाच ते सहा आवळ्याचे तुकडे उकळून घ्यावे लागेल. हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ते कापसाच्या साहाय्याने साधारण वीस मिनिटे आयब्रोवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयब्रो सामान्य पाण्याने धुवाव्या लागतील. आवळ्याच्या मदतीने आयब्रो काळ्या आणि दाट होऊ शकतात.

कांदा (Onion-Eyebrow Care)

आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला साधारण वीस मिनिटे कांद्याचा रस आयब्रोवर लावून ठेवावा  लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचं चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कांदा केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. त्यामुळे आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा फायदेशीर ठरू शकतो.

मेथी दाणे (Fenugreek seeds-Eyebrow Care)

मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर आयब्रोची वाढ वाढवण्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर मेथी दाणे भिजवून ठेवावे लागेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मेथी दाण्याची जाडसर पेस्ट बनवून साधारण पंधरा मिनिटे ती आयब्रोवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयब्रो सामान्य पाण्याने धुवाव्या लागतील.

आयब्रोची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही लसणाचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

मध आणि लसूण (Honey and Garlic-For Hair Care)

लसूण आणि मधाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला मिळू शकते. यासाठी तुम्हाला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यामध्ये एक चमचा मध मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. तयार झालेली ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावी लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस शाम्पूने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

कांदा आणि लसूण (Onion and Garlic-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी कांदा आणि लसूण उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन कप पाण्यात एक कांदा, चार लवंग, दालचिनीचा तुकडा आणि दोन लसणाच्या पाकळ्या मिसळून उकळून घ्यावा लागेल. हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना साधारण वीस मिनिटे लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या