Share

धक्कादायक । Walmik Karad ने बीड पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट, iPhone वाटले

walmik Karad distributed new bullets, iPhones to the police

Walmik Karad । आवादा कंपनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाने मोठा धक्का देत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असून सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा पोलीस तपास योग्य दिशेने होण्यासाठी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.

दरम्यान, वाल्मिकचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी समोर आणला आहे. तसेच त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावर गंभीर असे आरोप केले आहेत.

वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसेच नवीन iPhone दिले आहेत. आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. वाल्मिक समोर गोंडा घोळणारा PI पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व iphone दिल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केला आहे.

Walmik Karad distributed new bullets, iPhones to the police

भैया पाटील (Bhaiya Patil) त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहितात, ” आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात.. त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.तसेच बुलेट सोबत नवीन iphone सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकने दिले आहेत.. काल सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक समोर गोंडा घोळणारा PI पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व iphone वाल्मिक ने दिलेला..

बीड मध्ये एखांदा मर्डर करायचा असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचे कृत्ये करतात..त्यांचमुळे Pi महाजन व Pi पाटील यांना सहआरोपी करायला हवे.. जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत.. आमची मागणी आहे या गुन्ह्यात PI पाटील व PI महाजन यांचा सहभाग आहे हे नीच आमच्या जातींचे असो किंवा कोणत्याही जातींचे असो यांना फाशी द्या.. बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात iphone दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या.. किंवा हे वाल्मिक चे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी आशयाची पोस्ट पाटील यांनी केली आहे.

Bhaiya Patil criticizes Beed Collector Avinash Pathak

तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) हे वाल्मिक कराड याचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करून ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षांपासून सोबत असल्याचा दावा पाटील यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

Walmik Karad ने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसेच नवीन iPhone दिले आहेत. आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. PI पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व iphone दिल्याचा धक्कादायक खुलासा भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केला

Maharashtra Crime Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now