Electric Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स

Electric Car | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत चालले आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहन एक उत्तम पर्याय वाटत आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिकच लक्ष देत आहेत. भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहने लाँच होत चालली आहे. तर, काही सर्वोत्तम रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारामध्ये पुढील इलेक्ट्रिक कार सर्वाधिक रेंजसह उपलब्ध आहे.

मर्सिडीज-AMG EQS 53 4MATIC+

मर्सिडीज-AMG EQS 53 4MATIC+ ही इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार आहे. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरुम 2.45 लाख रुपये एवढी आहे. ही कार 580 किमी पर्यंतची WLTP प्रमाणित रेंज देते. ही कार बाजारामध्ये आकर्षक फीचर्ससह उपलब्ध आहे. या कारमध्ये 761hp पॉवरची इलेक्ट्रिक मोटर उपलब्ध आहे, जी 1,020Nm टार्क निर्माण करू शकते.

Kia EV6

भारतीय बाजारामध्ये Kia EV6 ही इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली जाते. या कारमध्ये 77.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ही कार सिंगल-मोटर, रियल-व्हील-ड्राईव्हसह 22hp पॉवर आणि 350Nm टार्क निर्माण करते आणि ड्युअल-मोटर, ऑल-व्हील-ड्राईव्हसह 325hp पॉवर आणि 605Nm टार्क निर्माण करू शकते. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जर 228 किमी WLTP प्रमाणित रेंज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 59.95 लाख रुपये एवढी आहे.

Hyundai Ioniq 5

ह्युंडाईची ही इलेक्ट्रिक कार नुकतीच भारतीय बाजारामध्ये लाँच झाली आहे. या कारमध्ये रियल-व्हील-ड्राईव्ह सिस्टीम उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक कार एका पूर्ण चार्जमध्ये 631 किमी ARAI प्रमाणित रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार 350kW DC फास्ट चार्जेरसह 18 मिनिटात 10 ते 80 % पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 44.95 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button