Suresh Dhas | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड ( Walmik Karad ) याच नाव समोर येतंय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा खास माणूस असल्याचं देखील समोर आलंय.
त्यामुळे या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांचं नाव जोडलं गेल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी हे प्रकरण सुरुवातीपासूनच चांगलंच लावून धरलं आहे. सुरेश धस हे या प्रकरणात रोजच नवीन खुलासे करताना दिसत आहेत.
या प्रकरणावर बोलताना यांनी परळी पॅटर्न चा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं होतं. प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतल्यानंतर धस यांनी माफी मागितली.
मात्र आता बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परळी पॅटर्नचा उल्लेख करत मुद्दे भटकवण्यासाठी कलाकार आणले जात आहेत, असा आरोप केला आहे. तसेच लोणावळ्यात डेल्ला रिसॉर्टवर आठ- आठ दिवस कोण कोण मुक्कामी होत याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यांनंतर एकच खळबळ उडाली आहे. डेल्ला रिसॉर्टवर नेमकं कोण मुक्कामी होतं?, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून धस अजून काही खुलासा करतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :