Share

खंडणीखोर Walmik Karad च पुण्यात करोडोंचं घबाड! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीसह व्यवसाय; वाचा सविस्तर

by MHD
Walmik Karad property in Pune

Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी मुख्य संशयित असणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडने शरण येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासह मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव जोडले जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वाल्मिक कराडवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“वाल्मिक कराडच्या शिमरी पारगाव इथे 50 एकर, बार्शीमध्ये 50 एकर जमीन आणि जामखेड 10- 15 एकर जमीन आहे. तसेच वॉचमनच्या नावावर देखील 15 ते 20 एकर जमीन असल्याचा दावा सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. तसेच एफसीरोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यामध्ये पार्टनर आहे.

त्या ठिकाणी देखील एफसी रोडवर कराडच्या नावाने सात दुकानं बुक असून यापैकी चार दुकाने स्वत:च्या नावावर आणि तीन दुकाने ही दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत. आठवे दुकान हे विष्णू बहीण सोनावणे यांच्या नावावर आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात बुक केलेल्या एका दुकानाची किंमत तब्बल 5 कोटीच्या घरात आहे.

इतकेच नाही तर कराडने मगरपट्ट्यामध्ये ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर बुक केला आहे. त्याची किंमत 75 कोटी आहे आणि अॅमनोरा पार्क, मगरपट्टा सिटीमध्ये एका फ्लॅटची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी आहे.

तसेच अंजली दमानिया यांनीही वाल्मिक कराड सह धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ह्या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे (Rajshree Dhananjay Munde) डायरेक्टर असून त्या कंपनीचा 2022 चा रेवन्यू 12 कोटी 27 लाख आहे. त्या बॅलन्स शीटमध्ये राजश्री मुंडे यांच्यासह वाल्मिक कराडच नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दर्शवलय. इंडिया सिमेंट कंपनीची राखेची वाहतूक हीच ट्रांसपोर्ट कंपनी करणार? म्हणजे कंपनी एकत्र, जमीन एकत्र” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Walmik Karad property in Pune

अजून बरेच खुलासे होतील, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी एक्सवर दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Anjali Damania has filed evidence of business relationship between Dhananjay Munde’s family and Walmik Karad.

Maharashtra Marathi News Politics