🕒 1 min read
Suresh Dhas । आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर अजित पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर प्रत्युत्तर देत असताना सुरेश धस यांनी मिटकरी यांना राष्ट्रवादीतील एक मुन्नी आरोप करायला सांगत आहे. त्या मुन्नीची मी सून्नी करणार असं यांनी म्हटलं होतं.
सुरेश धस यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. राष्ट्रवादीतील ही मुन्नी नेमकी कोण आहे?, या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता सुरेश धस यांनी पत्ते उलगडत ही मुन्नी कोणी महिला नसल्याचं म्हंटलंय. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे.”
Suresh Dhas Statement about Munni
“राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा…तू इथे ये…कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना कशाला बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या मुन्नीने पुढे यावं. मुन्नी पुढे आल्यावर मी सुन्नी करतो”, असं वक्तव्य धस यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, “कोण आहे हा…”
- खंडणीखोर Walmik Karad च पुण्यात करोडोंचं घबाड! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीसह व्यवसाय; वाचा सविस्तर
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर Ajit Pawar स्पष्टच बोलले; म्हणाले, “दोषी असतील तर त्यांची…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now