Share

Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, “कोण आहे हा…”

Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, "कोण आहे हा..."

Suresh Dhas । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ( Stantosh Deshmukh murder case) प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, तर या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु असल्याचं हाके म्हणालेत. मनोज जरांगे आणि सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

तसेच वाल्मिक कराडला यामध्ये अडकवलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनाच ‘एसआयटी’च प्रमुख बनवा असं म्हणत त्यांनी धस यांना टोला लगावला आहे.

Suresh Dhas On Laxman Hake

यावर प्रतिक्रिया देत सुरेश धस  ( Suresh Dhas ) यांनी हाकेंना चांगलंच फटकारलं आहे. राजकारण सोडा, कोण OBC नेते? कोणता OBC नेता आणला तुम्ही? कोण आहे हा हाके? कोणाला ही नेते करता काय तुम्ही?, असे सवाल करत त्यांनी हाकेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या :

सुरेश धस  ( Suresh Dhas ) यांनी हाकेंना चांगलंच फटकारलं आहे. राजकारण सोडा, कोण OBC नेते? कोणता OBC नेता आणला तुम्ही? कोण आहे हा हाके? कोणाला ही नेते करता काय तुम्ही?, असे सवाल करत त्यांनी हाकेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं. 

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now